Kombadi palan – कोंबडी पालन

Kombadi palanकोंबडी पालन हा व्यवसाय करताना पुढील बाबींचा विचार करावा लागतो : कोंबडीपालनाच्या पद्धती, कोंबड्यांची निगा आणि त्यांचे खाद्य, कोंबड्यांचे लसीकरण, लसीकरण करताना घ्यावयाची काळजी, मांसल पक्षांच्या घरांचे निर्जंतुकीकरण.

आजचे कोंबडी बाजार भाव जाणून घ्या

कोंबडी पालन

Kombadi palan करण्याच्या पद्धती

१) मोकाट किंवा गावठी पद्धत :

आपल्याकडे पक्षी पाळण्याची हि पद्धत  जुनी आहे. दिवसा शेतावर  अगर घराचे परड्यामध्ये कोंबड्या मोकाट सोडल्या जातात. तसेच पडलेले खाद्य किडे, दाणे, गवत वैगरे खाऊन जगत असतात. रात्रीच्या वेळी एका खुराड्यात किंवा खोक्यांमध्ये निवारा म्हणून कोंडतात. या पद्धतीस खर्च फारसा येत नाही.

पावसाळ्यात कोंबडी पालन आणि व्यवस्थापन कसे कराल जाणून घ्या

तोटे:

  1. पक्षांना त्यांच्या नैसर्गिक शत्रूपासून संरक्षण नसते.
  2. खाद्य पाणी, औषधे, अंडी गोळा करणे यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

२) अर्धमर्यादित

यामध्ये पहिल्या पद्धतीपेक्षा मर्यादा येते. ६ ते ८ फूट उंचीच्या चौकोनी जाळीच्या कुंपणात वाळूचा ठार अंथरतात. सभोवताली सावली करता लिंबू, पपई, चिकू ए. सारखी झुडपे लावावीत. मधोमध एक लाकडाचे किंवा सिमेंटच्या पत्र्याचे घर असते. दिवसा पक्षी रानामध्ये राहून खाद्य पाणी घेतात व सावलीसाठी झाडाखाली येतात. घरामध्ये खाद्य, औषध, पाणी देता येते.

आजचे कोंबडी बाजार भाव जाणून घ्या

तोटे :

  1. पक्षाची शक्ती हिंडण्यात जास्त खर्च होते.
  2. मर्यादीत पद्धतीप्रमाणे संरक्षण होत नाही.
  3. वाळूमधील विष्ठा  रोज गोळा करावी लागते.
  4. मर्यादित पद्धतीपेक्षा मजुरी जास्त लागते.

१००० बॉयलर पक्षांच्या फार्म साठी प्रकल्प अहवाल जाणून घ्या

३) मर्यादित पद्धत :

यामध्ये कोंबड्यांचे नैसर्गिक क्षत्रू ऊन, वारा, पाऊस इत्यादींपासून संरक्षण केले जाते. या पद्धती मध्ये दोन प्रकार आहेत.

अ ) गादी पद्धत
ब) पिंजरा पद्धत 

अ ) गादी पद्धत  :
यामध्ये घरात कोरड्या जमिनीवर झाडांच्या सालाची किंवा लाकडाचा भुसा, शेंगाची टरफले ,भाताचे तूस इत्यादींचा ४ इंच ते ६ इंच जाड थर गादीप्रमाणे अंथरला जातो .व त्यावर पक्षी पाळले जातात. पक्षांना साधारणपणे २ ते २.५ फूट जागा दिली जाते. पुढे नेहमी गादी खालीवर हलवून कोरडी ठेवली जाते व पुढे पक्षी गेल्यानंतर खत म्हणून वापरले जाते. घराला २ फूट उंचीची जाळी असते.

फायदे:

  1. पक्षांची शक्ती अंडी उत्पादनाकडे वापरली जाते.
  2. भिन्न हवामानापासून पक्षांचे चांगले संरक्षण होते.
  3. जागा कमी लागते.
  4. मजुरी कमी लागते.

तोटे

  1. काही वेळेस गादी वेळेवर न बदलल्यास आजाराची शक्यता असते.
  2. गादी ओली झाली असता हगवणीसारख्या आजाराची शक्यता असते.

ब) पिंजरा पद्धत   :
अंडी उत्पादनाकरिता अलीकडे हीच पद्धत प्रचलित आहे. गादी पद्धतीच्या घरामध्ये पिंजरे ठेऊन पक्षी कमी जागेत जास्त पाळता येतात. प्रति पक्षास ६० चौ. इंच जागा पुरेशी होते. जमिनीवर पिंजरे उभे करून त्यामध्ये पक्षी पाळले जातात. पिंजऱ्याला वर समोर तोंडास येईल अशी पाण्याची सोय व त्याखाली ढाळ ठेऊन अंडी घरंगळत येऊन गोळा होण्याची सोय केलेली असते. गादी किंवा इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा हि पद्धत फायद्याची आहे. अलीकडे पाण्याची सोया पन्हाळी ऐवजी नळ्यांनी करून प्रत्येक पक्षाच्या तोंडात येईल अशी पाण्याची आपोआप बंद होणारी ठिबक तोटी जोडलेली असते. पाइपमधून येणारे पाणी ठिबक तोटीस तोंड लावून पक्षी गरजेनुसार पितात. त्यामुळे पाण्याची नासाडी थांबते. पक्षांना तोटीने पाणी पिण्याची सवय लावता येते.

फायदे

  1. जागा कमी लागते. त्यामुळे पक्षांना हिंडता फिरता येत नाही.
  2. गादी पद्धतीपेक्षा खाद्य १० ते १५ ग्रॅम कमी लागते.
  3. जाळीवर पक्षी राहत विष्टेशी संपर्क येत नाही.
  4. खात चांगले मिळते.
  5. व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो.
  6. एक मनुष्य जास्त पक्षी सांभाळू शकतो. पक्षी ओळखणे सोपे जाते.
  7. चोरांपासून संरक्षण
  8. मजुरीवर खर्च कमी होतो.
  9. ठिबक तोटीने पाणी चांगले औषध युक्त पाणी पक्षास मिळू शकते. त्यामुळे पाण्याची बचत होऊ शकते.

Kombadi palan – निगा आणि त्यांचे खाद्य

Kombadi palan

कोंबड्यांची निगा :

कोंबड्यांचे तीन गट पडतात. पहिला आठ आठ्वड्यापर्यंत, दुसरा ९ ते १८-२० आठ्वड्यापर्यंत व तिसरा २० आठ्वड्यापर्यंत ग्रोअरमॅश व त्यांनतर लेअर मॅश असे म्हणतात. या तिन्ही मधील प्रथिनांचे प्रमाण अनुक्रमे २२, १६ व १८ टक्के असावे. खाद्यात दोन प्रकारचे अन्न घटक असावेत. १) ऊर्जा पुरविणारे २) प्रथिने पुरविणारे, ऊर्जा पुरविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली,गहू हि धान्य वापरतात तर प्रथिनांसाठी शेंगदाणा, सोयाबीन , तीळ पेंड तसेच मासे, मटण, खत इत्यादींचा उपयोग करावा.

कोंबडी पालन साठी लोन कसे घ्यावे? जाणून घ्या

कोंबड्यांचे खाद्य:

एकूण खर्चाच्या ६० ते ७० टक्के फक्त खांद्यावर होतो. त्यासाठी ते किफायतशीर ठरण्यासाठी खाद्य संपूर्णतः संतुलित व चांगले असावे. खाद्य वाया जाणार नाही अशा चांगल्या भांड्यात अर्धे भरून व्यवस्थित खाऊ घालावे.

कोंबड्यांचे लसीकरण

विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांपासून पक्षांचे रक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करण्यात येते. लसीकरण केल्यामुळे पक्षांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रोग होऊन होणारे नुकसान टाळता येते. एखाद्या विशिष्ट रोगावर लस तयार करताना लसीमध्ये तो रोग निर्माण करणारे जिवंत , मृत किंवा अर्धमृत (शक्ती कमी केलेले ) विषाणू असतात. कोरडी पावडर किंवा द्रव मिश्रित अशा स्वरूपातील विविध महत्वाच्या रोगांवरील लसी बाजारात मिळतात. त्यांची साठवणूक व वाहतूक कमी तापमानावर (२-४सें) करणे अत्यावश्यक आहे. तसेच लसीकरणाचे वय व पद्धत हे सुद्धा तितकेच महत्वाचे असते.

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

पक्षांना लस देतांना काही विशिष्ट मुद्यांकडे कटाक्षाने लक्ष देणे महत्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास लसीकरण परिणामकारक होत नाही व पुढे पक्षी रोगाला बळी पडण्याची शक्यता असते.

  1. निरोगी पक्षांनाच लस द्यावी.
  2. लसीच्या वेष्टनांवर लिहिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. उत्पादकाने उल्लेख केल्याप्रमाणे लस तयार करावी व उल्लेख केलेल्या कालावधीच्या आतच लसीचा वापर करावा.
  3. लस देतेवेळी ती बर्फाच्या भांड्यातच ठेवावी.
  4. लस योग्य वयात, योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीनेच दिली गेली पाहिजे.
  5. लसीकरणाची सर्व उपकरणे पाण्यात उकळून नंतर थंड करून मगच लस द्यावी व लसीकरण झाल्यानंतर सुद्धा पाण्यात उकळून योग्य स्थळी ठेवावी.
  6. लसीच्या रिकाम्या बाटल्यांची दूरवर पुरून विल्हेवाट लावावी.
  7. लस टोचल्यावर पक्षांवर ताण पडतो. म्हणून लसीकरणाच्या एक दिवस अगोदर व दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर जीवनसत्वे व इतर ताण दूर करणारी औषधे द्यावीत.
  8. मोठ्या संख्येने पक्षी ठेवलेल्या फार्ममध्ये काही रोगांची लस पाण्याद्वारे देतात. अशावेळी पक्षांनी पिण्याच्या पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण करणारे कोणतेही औषध टाकू नये तसेच लस सर्वत्र पाण्यात पसरण्यासाठी दुधाची भुकटी पाण्यात मिसळावी .
  9. पाण्यातून लस देण्यापूर्वी सुमारे एक तास पक्षांना साधे पाणी देऊ नये. त्यामुळे तहानलेले सर्व पक्षी लसमिश्रित पाणी लवकरात लवकर संपवतात.

पोल्ट्री फीड उत्पादन व्यवसाय जाणून घ्या.

मांसल पक्षांच्या घरांचे निर्जंतुकीकरण

मांसल कोंबडीपालन व्यवसायामध्ये पक्षांची विक्रीसाठी तयार झालेली एक बॅच बाजारात गेल्यानंतर व नवीन पिल्ले येण्याअगोदर घरांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणे खूपच महत्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या पक्षांच्या वास्तव्याने किंवा काही अन्य मार्गाने घरामध्ये शिरलेल्या रोगजंतूंचा नायनाट करण्यास मदत होते व नवीन पिल्लांचे रोगांपासून रक्षण होते.

रोग नियंत्रणासाठी घराची स्वछता व निर्जंतुकीकरण खालील प्रमाणे करावे.

  1. जुने तूस खरडून काढावे.
  2. घराची जमीन / फरशी स्वच पाण्याने धुवावी.
  3. त्यांनंतर जमिनीवर धुण्याचा सोडा ब्लिचिंग पावडर १०००चौ. फुटाला १ किलो या प्रमाणात पसरावी.
  4. पावडर पाण्यात मुरेल एवढ्या प्रमाणात पाणी टाकावे.
  5. तीन ते ४ तासानंतर घराची जमीन पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवावी.
  6. घराच्या भिंती, जाळ्या व छत २ टक्के धुण्याचा सोडा मिश्रित पाण्याने फवारून घ्याव्यात.
  7. फ्लेम गणच्या साहाय्याने घरामधील सर्व फोती / कपारी जाळून घ्याव्यात.
  8. पक्षाच्या संगोपनासाठी उपयोगात येणारी सर्व उपकरणे धुण्याचा सोडा/ निर्जंतुक औषधाने धुवून उन्हात वाळवावी.
  9. भिंतींना चुना लावताना त्यात फॉरमॅलीन हे जंतुनाशक १०० ली. प्रति २५०० चौ. फूट जागा या प्रमाणात मिसळावे.
  10. सर्व उपकरणे तूस पसरवून झाल्यांनतर घरात ठेवावी.
  11. घराच्या सभोवताली फॉरमॅलीन किंवा आयोडीन घटक याची फवारणी करावी. पिल्ले झाल्यानंतर सुद्धा रोगप्रतिबंधक उपाय म्हणून आठवड्यातून दोन वेळा हि फवारणी करावी.
  12. पोटॅशियम क्लोरॅमिन – टी या जंतूनाशक औषधांच्या १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घराच्या आतमध्ये फवारा मारावा.
  13. पक्षाच्या पिण्याच्या पाण्याने आयोडीन किंवा क्लोरीन पदार्थ वापरून शुद्धीकरण करावे.

Leave Comment

आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा

शेतीसाठी वापरले जाणारे प्राकृतिक किटकनाशक बाजरी शेतीसाठी आवश्यक हवामान आणि माती Spraying Drones शेतीसाठी फायदे काय व कसे आहेत? शेतीसाठी स्काउटिंग ड्रोन्स (Scouting drone) चे फायदे व वापर कृषी अर्थसंकल्प म्हणजे काय? | Agriculture budget?