आपलया भारत देशात कुक्कुट पालन व्यवसाय हा घरातील कोंबडीपालनातून वाढीस लागला आहे. काळाची गरज, मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार या व्यवसायाची गेल्या दोन दशकांमध्ये चांगलीच प्रगती झाली आहे. भारतामध्ये या व्यवसायात व्यापक प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. आम्ही संपूर्ण kukut palan information in marathi मध्ये सादर करत आहोत. आपण आधुनिक व मूलभूत व्यवस्थापनाची जोड दिल्यास योग्य प्रकारे या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो.
थोडक्यात kukut palan marathi मध्ये
कुक्कुटपालन हा पशुसंवर्धनाचा एक प्रकार आहे, ह्यात कोंबडी, बदके, टर्की, हंस इत्यादी पाळीव पक्ष्यांना वाढवले जाते व त्यांचे मांस आणि अंडी यांचा खाण्या साठी वापर केला जातो. कोंबडी – मुख्यतः कोंबडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. दरवर्षी 60 अब्जाहूनही अधिक कोंबड्यांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. अंडीसाठी वाढवलेल्या कोंबड्यांना थर म्हणून ओळखले जाते, तर मांसासाठी वाढवलेल्या कोंबडीला ब्रॉयलर असे म्हणतात.
कुक्कुटपालन व्यवसायाचे फायदे
- गाय, म्हैस इत्यादींपेक्षा जागा,पाणी कमी लागते.
- गादी पद्धतीत प्रति पक्षास दोन ते अडीच चौरस फूट व पिंजरा पद्धतीत ६० ते ७५ चौ. इंच जागा लागते.
- इतर व्यवसायापेक्षा उत्पन्न लवकर अंडी उत्पादन होते. ७ ते ८ मांसल पक्षी विक्रीस तयार होतात.
- पक्षांची वाहतूक सुलभ होते.
- अंदाजे ७० ते ७२ आठवड्यात खताचे उत्पादन २५ किलो येते.
- अंड्यामध्ये भेसळीला वाव नसतो.
- साधारणपणे सज्ञान स्त्री – पुरुषास हा व्यवसाय अल्प प्रशिक्षण घेऊन सुरु करता येतो.
- एक कप चहाच्या किंमतीत एक परिपूर्ण आहार असलेले अंडे खरेदी करू शकतात.
- अंडी व मांस उत्पादन करणारी कोंबडी हे जिवंत यंत्र आहे. १.७५० ते २ किलो खांद्यापासून १२ अंडी व २. ते २. किलो खाद्यापासून अंडझे १ किलो मांस मिळू शकते.
कुक्कुट पालन व्यवसायाच्या दृष्टीने खालील जाती महत्वाच्या दिसून येतात
व्हाईट लेग हॉर्न :
हि जात इटलीमधील लेगहॉर्न खेडे येथील असून वजनाने हलकी आणि सुधारित म्हणून प्रसिद्ध आहे. अंडी उत्पादनासाठी विदेशी प्रसिद्ध जात असून नराचे वजन २ ते २. व मादीचे वजन १. ते २ किलो असते. रंग पांढरा, तुरा,एकेरी तांबडा भडक मऊ व स्निग्ध युक्त असतो. अंड्यावर कोंबड्या आल्या कि तुरा एक बाजूस डोळ्यावर कल्ला असतो, कानाचे पाले मोत्यासारखे पांढरे असून गुलाबी ठिपके असतात. कातडी,चोच, पाय प्रथम पिवळे असतात. व नंतर पांढरे होतात. २० आठवड्याच्या सुमारास अंडी देण्यास सुरुवात करतात २०० ते २४०अंडी देतात परंतु या मधील सुधारलेल्या जाती (स्ट्रेन) अलीकडे ३०० पर्यंत अंडी देताना दिसून येऊ लागल्या आहेत. उदा. बॅबकॉक हे पक्षी भित्रे नाजूक पण देखणे व चपळ असतात. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मिळतात. देशी जाती सुधारणा पद्धतीत क्रमशः सुधार पद्धतीत यांचा वापर केला जातो.
ऱ्होड आयलंड रेड :
हे पक्षी ऱ्होड बेटावर प्रथम मिळाले. त्यांचा रंग तांबडा शरीर लांबट चौकोनी असून फुगीर असते. तुरा एकेरी कानाचे पाळे व डोळे तांबडे असतात. पाय पिवळे किंवा तांबड्या तपकिरी रंगाचे असतात. वजन नर ३ ते ३.५ किलो व मादी २ ते २.५ किलो असते. अंड्याचा रंग तांबूस असतो.
उपयोग: अंडी व मांस दोन्ही करीता प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे खेड्यामध्ये जास्त प्रसार होऊ लागला आहे. अंडी सरासरी वर्षाला १८० ते २०० त्यांचा उपयोग क्रमशः सुधार पद्धतीमध्ये होतो.
ऑस्ट्रोलार्प :
ऑस्ट्रेलियात हा पक्षी असून पाठ रुंद, कातडी काळपट रंगाची, वजन नर ३ ते ३.५ किलो व मादी २ ते २.५ किलो असते. रंग काळपट असतो. अंड्याचा रंग हस्तिदंत सारखा किंचित पिवळा असतो. तुरा तांबडा पण लहान असतो.
उपयोग: पावसाळी भागात चांगला टिकाव धरतात. व्हाईट लेगहॉर्न वर संकर करून वाढविले जातात. वार्षिक अंडी उत्पादन सरासरी १८० ते २००.
प्लायमाऊथ रॉक :
व्हाईट प्लायमाऊथ रॉक वजनाने भारी लठ्ठ असल्याने जगभर प्रसिद्ध आहे अंड्याचे प्रमाण कमी, पाठ रुंद असते. व्हाईट प्लायमाऊथ रॉक आणि व्हाईट कॉर्निश यांचा उपयोग ब्रॉयलर निर्मितीसाठी केला जातो.
असिल :
भारतातील लढाऊ व कणखर जात असून नर कोंबड्यातील झुंजीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या आंध्र प्रदेशात दिसून येतात.
कडकनाथ :
मध्य प्रदेशात दिसून येतात. उत्पादन कायम ठेवण्याच्या दृष्टीने जुने पक्षी काढून त्यांच्या बदली नवीन पक्षी वाढविणे जरुरीचे असते.
पक्षांची पैदास करण्याच्या पद्धती
शुद्ध जातीची पैदास :
या पद्धतीमध्ये एकाच जातीचे नर व मादी एकत्र ठेवून पैदास केली जाते. त्यामुळे मिळणारे पिल्लू हे शुद्ध जातीचे असते. उदा. व्हाईट लेगहॉर्न नर व मादी.
इन बिडिंग :
अतिशय जवळच्या नात्यातील नर व मादी एकत्र ठेऊन उदा. भाऊ व बहीण यामुळे चांगले व वाईट गुणधर्म एकत्र येतात. यामुळे अंतिम दृष्ट्या हि पद्धत टाळणे फायद्याचे.
विजातीय पद्धत :
या पद्धतीमध्ये नर व मादी भिन्न जातीचे एकत्र ठेऊन पैदास केली जाते. निघणाऱ्या जातीमध्ये दोन्ही जातीचे गुण असतात. (उदा. चांगली वाढ होण्याचा गुण व चांगली अंडी घालण्याचा गुण अथवा वजन वाढण्याचा गुण असे पिल्लात एकत्र येतात. म्हणून व्यवसायाच्या दृष्टीने हि पैदास महत्वाची ठरते. विजातीय पद्धतीमध्ये पिलांची जात लावताना प्रथम नराच्या जातीचे नाव व नंतर मादीच्या जातीचे नाव लावतात.
उदा. ऑस्ट्रोलार्प नर व्हाईट लेगहॉर्न मादी ऑस्ट्रो व्हाईट .
क्रमशः सुधार पद्धत (अपग्रेडींग) :
हि एक प्रकारची विजातीय पद्धत आहे. परंतु हीचा उपयोग देशी जातीमध्ये सुधारणा करण्याकरिता करतात. प्रत्येक पिढीमध्ये थोड्या क्रमाक्रमाने सुधारणा होत जाते. म्हणून त्याला क्रमश: सुधार पद्धत म्हणतात. हि पद्धत व्यापारी तत्वावरील व्यवसायात उपयोगी पडत नाही. परंतु लहान प्रमाणात देशी पक्षांची सुधारणा करता येते. या पद्धतीमध्ये शुद्ध सुधारित जातीचा नर व देशी कोंबडी वापरतात.