शेळी पालन माहिती | Goat Farming
शेळी पालन (Sheli palan) हा आपल्या कृषिप्रधान देशात जोडधंदा केला जातो, जसे गाई म्हशींचे पालन, कुक्कुटपालन असे जोडधंदे केले जातात. गाई – म्हशींच्या व्यवसायाकरिता लागणारे भांडवल, त्यांचे संगोपन व खांद्यावर होणार प्रचंड खर्च त्याचप्रमाणे मोठ्या जनावरांचे तुलनेने शेळीपालन हे कमी खर्चाचे आहे. त्यामुळेच शेळीला “गरीबांची गाय ” म्हणून संबोधिले जाते. Sheli palan marathi मध्ये विस्तृत माहिती येथे दिलेली आहे.
शेळी पालनाचा उद्योग करताना कच्चा माल लागणार तो म्हणजे चारा व दूध शेळ्यांचे मांस याला मोठी बाजारपेठ केवळ शहरातच नव्हे तर खेड्यातही उपलब्ध आहे.
शेळ्या रोगाला बळी पडण्याचे प्रमाण कमी आहे. उष्ण व कोरड्या हवामानात शेळीची चांगली वाढ होते. शेळी हा प्राणी आकाराने लहान असल्याने जास्त शेळ्या कमी जागेत राहू शकतात. शेळीपालन व्यवसायामध्ये केलेल्या गुंतवणुकीची उलाढाल जलदरीत्या होते. शेळ्यांपासून कमी वयातच दूध मिळते. तसेच शेळीच्या मांसाला खूप मागणी आहे.
शेळीला लागणारा चार हा गायी आणि म्हशींच्या तुलनेत १/५ व १/६ चारा लागतो.
शेळी संगोपनापासून होणारे फायदे :
- शेळीपासून लहान वयात दूध मिळते.
- शेळ्यांना चारा कमी लागतो. शेळीला गाईपेक्षा १/५ व म्हशीपेक्षा १/६ चार लागतो.
- शेळीचे दूध पचनास अतिशय हलके व पौष्टिक असते. त्यातील स्निग्धांश कण अतिशय बारीक असल्याने व दुधात चांगले विखरूले असल्याने पचनास सुलभ असतात. शेळीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असल्याने ते दूध पौष्टिक असते.
- शेळीचा उपयोग दूध, मांस, कातडी, केस व खताच्या उत्पादनासाठी होतो.
- शेळीच्या मांसात चरबीचे प्रमाण कमी असल्याने मानवाच्या आहारांत त्याला विशेष महत्व आहे.
- शेळीच्या शिंगापासून व खुरांपासून उत्तम प्रकारचा डिंकयुक्त पदार्थ बनविला जातो.
- शेळी हा प्राणी आकाराने लहान असल्याने मोठ्या कळपाची वाढ हि झपाट्याने होते.
- शेळी व्यवसायात गुंतविलेल्या पैशांची उलाढाल ताबडतोब होते. कारण हे जनावर अगदी अल्पावधीतच परिपक्व होते. ८ ते १० महिन्यापर्यंत वाढविलेली करडे मासांसाठी चालतात.
शेळी पालन विषयी माहिती
महाराष्ट्रात १९९२ चे पशु गणनेनुसार सुमारे ९९ लाख शेळ्या आहेत. तथापि या बहुतेक गावठी तसेच उस्मानाबादी जातीच्या आहेत जमनापरी , बारबेरी, अजमेरी या जातीच्या शेळ्या, मेंढ्या व बोकड परप्रांतातून आणून वाटले होते.
दुधासाठी, दूध व मांस देणाऱ्या शेळ्यांमध्ये उस्मानाबादी, सुरती, बारबेरी, जमनापरी, मलबारी,मेहंसाना व झालावाडी, बीटल, सिरोही, अजमेरा कच्छी या जाती प्रसिद्ध आहेत.
मांस उत्पादनासाठी डोंगरी, काली बंगाली, तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मिरी गंजभ या जाती चांगल्या आहेत. लोकर निर्माण करणाऱ्या जाती अंगोरा, गद्दी (हिमाचल प्रदेश) पश्मिना (काश्मीर) या जाती आहेत.
शेळ्यांची निवड करताना
- शेळीची वाढ वयाप्रमाणे झालेली असावी. शक्यतो १ वीत झालेली शेळी विकत घ्यावी.
- एका वर्षात शेळीचे वजन ३० कि. पेक्षा कमी असू नये.
- शेळीची कांस मोठी व मऊ असावी. सड सारख्या लांबीचे व जाडीचे असावे.
- छाती भरदार व पोट डेरेदार असावे.
- शेळी नीटपणे माजावर येणारी व न उलटणारी असावी.
- दोन वर्षात तीन व्हते देणारी असावी.
- कळपातील पैदाशीचा बोकड दर दोन वर्षांनी बदलावा लागतो.
शेळ्यांच्या वाढ
शेळ्या साधारणतः: ९ ते १२ महिन्याच्या काळात वयात येतात. प्रथम १५ते १८ महिने गाभण राहतात. गाभण राहताना त्यांचे वजन जवळ जवळ १८ ते २० किलो असते. गाभाणाचा कालावधी जवळ जवळ १४५ ते १५० दिवसांचा असतो. शेळ्यांचे उत्पादक आयुष्य ६ ते ७ वर्ष असते.
शेळीपालन : आधारित उद्योग माहिती
शेळीपालनावर आधारित अनेक प्रकारचे उद्योग करतात. या उद्योगांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येईल.
- मासांवर आधारित उद्योग
शेळ्यांपासून मिळणाऱ्या मांसाला विशेष मागणी आहे. त्यामुळे शेळ्या या खाटकाला विकून त्यातून पैसे कमवू शकतात. - दुधावर आधारित उद्योग
बकऱ्यांचे दूध आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. बकऱ्यांचे दूध विक्री व्यवस्थेच्या अभावामुळे त्याची विक्रीची साखळी नाही. व्यवसाय करण्यासाठी त्याचा स्वीकार तितकासा नाही. - चामडे, तसेच लोकरीवर आधारित उद्योग
पर्वतीय भागात बकऱ्यांपासून मिळणारी मऊ लोकर हि फार प्रसिद्ध आहे. चामड्याचे पट्टे, बाग, गरम कपडे बनविण्याकरिता शेळ्यांच्या कार्डीचा उपयोग केला जातो. तसेच बकऱ्यांच्या चामड्यांपासून हातमौजे, बूट, जॅकेट बनविली जातात. त्यांना देशातच नव्हे तर परदेशातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. अशाप्रकारे चामड्यावर आधारित उद्योग केले जाऊ शकतात.
शेळीपालन : शेळ्यांच्या जाती
- जमनापरी
हि जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि चंबळ नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते. उत्तम दूध व मांसासाठी ही जात प्रसिद्ध आहे. या जातीच्या शेळ्या दणकट, चपळ, देखण्या,उंच व रंगाने पांढऱ्या, पिवळसर असतात. या जातीच्या नराचे वजन ६० ते ९० किलो व मादीचे वजन ५० ते ६० किलो असते. एका वेतात ( ३०५ दिवसात) शेळी ६०० लिटर दूध देते. या जातीमध्ये एकावेळी दोन करडे देण्याचे प्रमाण आहे. - बारबेरी
ही जात उत्तर प्रदेशातील इटावा, आग्रा, मथुरा, अलिगढ या भागात आढळून येते. ही जात दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे. नराचे वजन ४० ते ५० किलो व मादीचे वजन ३५ ते ४० किलो असते. रंग पंधरा असून अंगावर काळे ठिपके आढळतात. पाय आखूड असल्याने त्या बुटक्या दिसतात. शेळ्या १५ महिन्यात दोन वेट देतात. या दोन किंवा तीन करडांना जन्म देतात. या शेळ्या सरासरी रोज १.५ ते २ लिटर दूध देतात. एका वेतात साधारणपणे २५० ते ३०० लिटर दूध मिळते. - ब्लॅक बंगाल
या जातीच्या शेळ्या प. बंगालमध्ये आढळतात. यांचे मांस अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. कातडी मऊ असल्याने भारतात आणि परदेशात तिला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हि जात एका वेळी दोन किंवा तीन पिलांना जन्म देते. शेळ्या रंगाने काळ्या आणि तांबड्या असतात. शेळ्यांचे सरासरी वजन १५ किलो असते. - सिरोही ( अजमेरी)
ही जात प्रामुख्याने राजस्थान व आजूबाजूच्या भागात आढळून येते. हि जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे. या जातीच्या शेळ्या बांध्याने मजबूत असून मध्यम आकाराच्या असतात. रंग फिकट तपकिरी असून त्यावर गडद रंगाचे मोठे ठिपके असतात.शिंगे मध्यम असून मागे वळलेली असतात. नराचे वजन ५० किलो तर मादीचे वजन २५ किलो असते. - उस्मानाबादी
या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात उस्मानाबाद भागात आढळतात. या आकाराने मोठ्या असून मांसासाठी प्रसिद्ध आहेत. यांचा रंग काळा असून शिंगे मोठी असतात. या जातीत बरेचदा काळा किंवा पांढरा रंग सुद्धा आढळतो. - संगमनेरी शेळी
संगमनेरी शेळी ही जात मांस व दूध उत्पादनासाठी वापरली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचे मुळ स्थान असल्याने तिला संगमनेरी हे नाव पडले आहे.या शेळ्यांमध्ये मादीचे वजन ३२ किलोपर्यंत तर नराचे वजन ३९ किलोपर्यंत असते. जन्माच्या वेळी करडांचे वजन १ ते १.५ किलोच्या जवळपास असते. एक करडू देण्याचं प्रमाण-७५ टक्के, जुळी करडे देण्याचे प्रमाण २१ टक्के , तिळ्याचे प्रमाण ४ टक्के असते. - कोकण कन्याल
या मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात. ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे.ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.
शेळी पालन : गाभण शेळीची निगा व आहार
मेंढी व शेळी ८ वर्षे वयापर्यंत कळपात ठेवावी. नंतर तिची उत्पादन क्षमता कमी होते. म्हणून विकून टाकावी किंवा मांसाकरिता वापरावी. नर तीन वर्षापर्यंत कळपात ठेवावा व नंतर काढून टाकावा.
व्याल्यानंतर लगेच ६० -७० दिवसाच्या आत मेंढी व शेळी पुन्हा फ्लवीत येते. त्यामुळे एकाच वर्षात दोन वेळा किंवा दोन वर्षात तीन वेळा विण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यातील उष्णतेचा नर व मादी यांच्या प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होतो. विशेषतः गर्भधारणेनंतर २५ दिवसात माद्यांना अपाय जास्त होतो. त्याकरिता त्या काळात गाभण माद्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना फक्त सकाळचे किंवा सायंकाळचे थंड वेळी चारावे आणि त्यांचा उष्णतेपासून बचाव करावा.
शेळ्या मेंढ्या यांचे वीर्य आता १९६ अंश से. शून्याखालच्या तापमानावर वर्षानुवर्षे गोठवून ठेवण्याची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे.
उन्हाळ्यातील उष्णतेचा नर व मादी यांच्या प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होतो. विशेषतः गर्भधारणेनंतर २५ दिवसात माद्यांना अपाय जास्त होतो. त्याकरिता त्या काळात गाभण माद्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना फक्त सकाळचे किंवा सायंकाळचे थंड वेळी चारावे आणि त्यांचा उष्णतेपासून बचाव करावा.
शेळ्या मेंढ्या यांचे वीर्य आता १९६ अंश से. शून्याखालच्या तापमानावर वर्षानुवर्षे गोठवून ठेवण्याची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे.
या पद्धतीमुळे ज्या जातीचे आणि जितके वीर्य हवे असेल ते देशातून किंवा परदेशातून उपलब्ध होऊ शकते. कृत्रिम रेतनाकरिता अशा गोठविलेल्या वीर्याचा उपयोग होतो व त्या योगे धडधाकट प्रजा उत्पन्न करता येते. कृत्रिम गर्भधारणेच्या वेळेला ठेवलेले वीर्य देखील आता उपयोगात आणले जाते.
शेळीला बरेच वेळा दोन ते तीन करडे होतात. तेव्हा गर्भाची वाढ व स्वतः चे पोषण यासाठी शेळीस अधिक सकस चारा व तयार खाद्य देणे फार जरुरीचे आहे. शेळी विन्यास एक महिना असताना दूध काढणे बंद करावे. व या काळात त्या २०० ते २५० ग्रॅम खाद्य द्यावे. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते. साधारणतः शेळी वित्त असताना फार कमी वेळा अडचणी येतात. परंतु अडचणी आल्यास तज्ञ पशुवैद्यकाकडून सोडवणूक करून घेऊनत्यांना धनुर्वात न होण्याकरिता इंजेकशन द्यावीत. नवजात पिल्लास शेळी पुसून स्वच्छ करावे. नाकातोंडातील घाण हाताने काढावी. थोड्याच वेळात पिलू उठून उभे राहण्याचा प्रयत्न करते. तसे उभे करून त्याला त्वरित कच्चे दूध पिण्यास कासेजवळ सोडावे. दूध काढण्यापूर्वी शेळीच्या मांडीवरील व कसेवरील लांब केस कापावे. कास स्वच्छ पाण्याने धुवावी म्हणजे दुधाला वास येणार नाही.
शेळी पालन : शेळ्यांची निवास व्यवस्था
शेळ्या मोकळ्या सोडण्यासाठी खाली सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- दुधाळ असणाऱ्या शेळ्यांसाठी खाद्याचा प्रबंध सामान्य शेळ्यांच्या कळपापेक्षा वेगळा असावा. दुधाळ शेळ्यांसाठी ८-१० च्या संख्येत वेगळी व्यवस्था असावी. दूध काढण्यासाठी व्यवस्था वेगळी असावी.
- गाभण बकरीस प्रसूती तारखेच्या ४ – ७ दिवस अगोदर वेगळ्या वाड्यात कोंडणे आवश्यक आहे.
- करंडाची वेगळी व्यवस्था करणे आवश्यक आहे. समजा शेळ्यांची संख्या जास्त असल्यास करडांसाठी वेगळे घर बांधता येते. अन्यथा पशुशाळेतच पडदी लावून करडांसाठी वेगळी जागा तयार करता येते.
- बोकडांना १० – १५ च्या संख्येत शेळ्यांच्या कळपापासून वेगळे ठेवावे.
- बोकडांना १० – १५ च्या संख्येत शेळ्यांच्या कळपापासून वेगळे ठेवावे.
- खाद्य व पाण्याचा प्रबंध एका शेळीस खाद्य खाण्यास ४० – ५० से.मी. जागा करडांना ३० – ३५ से.मी. जागा पर्याप्त असते. मोठ्या शेळ्यांना ५०- ३०- ३५ से.मी. असणारी भांडे तथा करडांसाठी ५० – २० -२५ से. मी. असणारी भांडे पर्याप्त असतात.
वर वर्णिलेल्या गोष्टींचा जास्तीत जास्त अवलंब केल्यास तितकेच आरामदायक वातावरण आपण आपल्या शेळ्यांना प्रदान करू शकाल. शेळ्यांच्या उत्पादन शक्तीचा पूर्ण उपभोग घ्यायचा असल्यास अनुकूल वातावरण अत्यंत आवश्यक आहे.
Dr.Y.B.Bayas
July 26, 2022 @ 1:13 pm
छान व उपयुक्त माहिती
जयश्री मुरकुटे
August 27, 2022 @ 6:26 am
धन्यवाद
Atish tupe
September 28, 2022 @ 11:10 am
Sir Information criteria is Good. You are whatsapp group create.
Please issue the goat fram book.
Thank You
MANOJ BAPU KASABE
September 26, 2023 @ 3:17 pm
Please give details for goat project report.