शेती ही वनस्पती आणि पशुधन जोपासण्याचे विज्ञान आणि कला आहे. हजारो वर्षांपूर्वी शेतीचा इतिहास सुरू झाला. या संकेत स्थळावर तुम्हाला कृषी संदर्भात, शेती आधारित उद्योग यांची माहिती मिळेल.

कृषि आधारित व्यवसाय  करणे ही काळाची गरज आहे. पर्जन्य वर शेती व्यायसाय प्रगत होतो. परंतू  अवेळी पडणारा पाऊस व शेतकऱ्यांसमोर उभे राहणारे संकट, वाढती बेरोजगारी व नोकऱ्यांचा अभाव हा संदर्भ आम्ही समोर ठेऊन शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय, म्हैस पालन, दुग्ध व्यवसाय गतिमान व्हावा व सर्व सामान्य बेरोजगाराला आपला स्वतःचा व्यवसाय उभारता यावा, यासाठी बहुसंख्य व्यायसायंकाची उद्योजकांची भिस्त बँकेकडून कर्ज घेण्याची इच्छा असते. परंतू अनेक वेळा विलंब होतो त्यामुळे तो अडचणींचा प्रश्न निर्माण होत असला तरी काही आर्थिक स्वबळावर व्यवसाय उभारता येतो.

या संकेत स्थळामध्ये अनेक तज्ञांचे मत घेऊन जनावरांचे आजार कसे ओळखता येतील व त्यावर प्राथमिक उपचार असे अनेक  प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन व्ययसाय सुरु करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले आहे. त्याच प्रमाणे घरच्या घरी पशुखाद्य कसे तयार करता येईल. या बद्दल देखील माहिती दिली आहे.

मत्स्यशेती उद्योग ते मधमाशा पालन उद्योग व्यवसायाची माहिती देण्याचे, ससेपालन, दुग्ध तंत्रज्ञान इत्यादी महत्वपूर्ण बाबींवर माहिती दिली आहे. त्यामुळे कृषी आधारित उद्योगात आपण कसे यशस्वी व्हाल यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. आपण प्रशिक्षण घेऊन प्रयत्न केले तर यशस्वी होऊ शकता.