शेळी पालन शेड (Goat rearing shed) – शेळ्यांचे सुधारित व बंदिस्त पद्धतीने संगोपन करण्यासाठी थंडी, वर, ऊन, पाऊस व शेळ्यांचे इतर शत्रूंपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांना स्वतंत्र गोठा आवश्यक आहे. sheli palan shed structure साठी महत्वाचे काही मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे.
- शेळ्यांच्या गोठ्यासाठी निवडलेली जागा वाहतुकीच्या रस्त्यापासून सुमारे १ ते १.५ कि.मी अंतरावर असावी. रस्त्याच्या अगदीच जवळ असल्यास ध्वनी, वायू प्रदूषण होते, चोरीची शक्यता असते. सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- गोठ्याची जागा उंचवट्यावर मुरमाड व पाण्याचा लवकर निचरा होणारी असावी. ओलसर किंवा चिखलाच्या जागेवर शेळ्या वाढत नाहीत.
- शेळ्या, बोकड व करडांना गोठ्यात प्रत्येकी अनुक्रमे ३-६०. ४-६०. १ – चौ. मीटर छताखालील जागा व किमान दुप्पट मोकळी जागा जाळीच्या कुंपणाची फिरण्यासाठी आवश्यक असते.
- गोठ्यात चारा पाणी ठेवण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या गव्हाणी असाव्यात. मुबलक प्रमाणात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध ठेवावे. पाणी पिण्याची भांडी दर आठवड्याला धुवून स्वच्छ करावीत व त्यांना चुना लावावा.
- शेळ्यांच्या कळपातील गाभण शेळ्या पैदाशीचे बोकड, नर, मादी, करडे व आजारी शेळ्या विणाऱ्या शेळ्यांसाठी जाळीच्या साहाय्याने स्वतंत्र कप्पे गोठ्यात करावेत. विविध गटातील शेळ्या, करडांना व बोकडांना गरजेनुसार सकस आहार द्यावा.
- शेळ्यांच्या गोठ्यांची दिशा पूर्वभिमुख रुंदी व लांबी दक्षिणोत्तर असावी. सूर्याची किरणे गोठ्यात येतील व दोन्ही बाजूला चौकडी जाळी ठेवावी म्हणजे हवा खेळती राहील त्यामुळे शुद्ध हवेचा पुरवठा होईल. गोठ्यात ओल राहणार नाही.
- गोठ्याच्या छतासाठी सिमेंटचे पत्रे टिकाऊ व उष्णता विरोधी असल्याने उपयुक्त ठरतात. तथापि स्थानिकरीत्या उपलब्ध साहित्याचा उपयोग करता येईल व कमी खर्चाचा गोठा उभारता येईल. गोठ्याची जमीन मुरमाची असावी व चौथरा जमिनीपासून सुमारे १.५ ते २ फूट उंच असावा.
- शेळ्यांची संख्या ५० ते १०० किंवा जास्त असल्यास खाद्य चारा साठविण्यासाठी स्टोअर रूम असावी. व पशु प्रथमोपचार करण्यासाठी औषधे व अवजारे ठेवण्यासाठी खोली असावी.
- शेळ्यांचा चारा वैरण कुटी करून देणे आवश्यक असते. त्यासाठी कडबाकुटी यंत्र असावे.
- मोठ्या प्रमाणात शेळ्यांचे संगोपन करणे अपेक्षित असल्यास पशुखाद्य तयार करण्यासाठी कमी क्षमतेचे मिक्सर व ग्राइंडर तसेच खाद्य निर्मितीचे घटक व खाद्य साठविण्यासाठी गोडाऊनची सोया असावी.
- शेळी संगोपन केंद्रावर अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचारी व कामगारांसाठी निवासाची सोया असावी.
- शेळ्यांची ट्रकमध्ये चढ- उत्तर करण्यासाठी धक्का असावी.
- शेळ्यांच्या अंगावरील प्रोजीवी गोचीड, उवा, माश्या इत्यादी आजारी शेळ्यांचे रक्त शोषण करून इतर शेळ्यांमध्ये आजाराचा प्रसार करतात. ते टाळण्यासाठी औषधीयुक्त पाण्यात शेळ्या पोहायला घालतात त्यासाठी सिमेंटचा पक्का हौद बांधून घ्यावा.
- मुरघास तयार करण्यासाठी व साठविण्यासाठी गोलाकार, चौकोनी जमिनीत खोल हौद बांधून घ्यावा अपेक्षित चाऱ्याच्या प्रमाणात हौदाचा आकार ठेवता येईल.
- शेळ्यांच्या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नव्याने विकत घेतलेल्या किंवा विक्रीसाठी बाजारातून पाठवून परत आणलेल्या शेळ्या स्वतंत्र गोठ्यात ठेवाव्यात व निरोगी असल्याची खात्री आल्यानंतरच कळपात मिसळाव्यात त्यासाठी स्वतंत्र गोठा असावा.
- विविध कारणाने मृत्यू पावलेल्या शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी ठराविक अंतरावर सोया करावी तसेच मृत शेळ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करावी.
- गोठ्यांची दैनंदिन स्वच्छता करावी तसेच जंतुनाशक औषधाची फवारणी करावी.
- शेळ्यांच्या गोठ्याच्या छताचा आकार झोपडी सारखा असावा. छतासाठी ज्वालाग्राही साहित्य उपयोगात आणले असल्यास अग्निशामक उपाययोजना सिद्ध ठेवावी.
- गोठ्यात उन्हाळ्यात वातावरण थंड ठेवण्यासाठी गोठ्यांजवळ वृक्ष लागवड करावी. शिवाय छतावर गवत, गव्हाचे कड, ऊसाचे पाचट टाकून त्यावर पाणी फवारावे.
- हिवाळ्यात गारठा व वाऱ्याचे झोत यापासून करडांच संरक्षण करण्यासाठी पशुखाद्याचे रिकामे बारदान गोठ्याच्या जाळीवर लावावे. गरजेनुसार त्यांची उपड्झप करावी.
- शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा वैरण २ ते ४ वेळा टाकावी. त्यासाठी चारा गोठ्यात साठविण्यासाठी छताखाली पोटमाळा करता येईल.
- गोठ्यात चारा वैरण शेळ्यांना खायला घालण्यासाठी आधुनिक पद्धतीची जागा बदलून तिथेही उचलून ठेवता येतील व शेळ्यांकडून चारा तुडवला जाणार नाही अशा पद्धतीचे ‘फिडर’ गव्हाणी गोठ्याच्या लगतच्या जाळीच्या कुंपण घातलेल्या मोकळ्या जागेत ठेवाव्यात.
मडके योगेश्वर गोकुळ
April 11, 2021 @ 2:23 am
शेळी पालन करतो आहे
ABDUL HAMID HASAN CHOUGHULE
July 12, 2021 @ 2:21 pm
KHUP CHAN AAHEY
PLS GIVE COST OF ACCOUNT & YEARLY PROFIT
Deshawn Buchinsky
April 24, 2022 @ 11:04 pm
Very good information. Lucky me I found your website by accident (stumbleupon). I’ve book-marked it for later!
SUKHDEV DHONDIRAM CHAUDHARI
July 29, 2023 @ 10:03 am
मला शेतकरी व्यवसाय सुरू करायचा आहे
Krishna kakde
July 30, 2023 @ 1:35 pm
Karj milne babt,muzhe loan ki jarurat hai. To Aap muzhe loan dene main intrested ho khya