Screenshot (15)

१००० बॉयलर पक्षांच्या फार्म साठी प्रकल्प अहवाल

बॉयलर पक्षांची भरपूर मागणी असून, कमी कालावधीत जलद पैसे मिळवून देणारा व्यवसाय किफायतशीरपणे करण्यासाठी खालील मुद्यांचा विचार करण्यात यावा.

आजचे कोंबडी बाजार भाव जाणून घ्या

boiler birds

१) प्रकल्पाचा खर्च वाचविण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या जागेत फार्म चालू करावा व दैनंदिन कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग घ्यावा.

२) डीप लिटर पद्धतीत पिल्ले ब्रदर हाऊसमध्ये २० दिवस ठेवावेत. त्यासाठी प्रत्येकी ०.५ चौ. फूट याप्रमाणे १०५० पिलांचा मृत्यूदर गृहीत धरून १००० पिलांना ५०० चौ. फूट जागा असावी. पुढील ४२ दिवसापर्यंत प्रत्येकी १ चौ. फूट जागा आवश्यक असून १०० चौ. फूट जागा असावी.

३) उत्तम नामांकित अंडी उबवून केंद्रातून पक्षी खरेदी करावेत. ब्रॉयलर पक्षांच्या खरेदीचा दर प्रत्येकी ११.० रुपये अपेक्षित धरावा.

४) सहा आठवड्यांचा काळात स्टार्टर मॅश, फिनीशर मॅश, प्रत्येकी ३.०० किलोग्रॅम लागते. खाद्याच्या खरेदीचा दर प्रतिटन रु. ७००० अपेक्षित असून, यासाठी खाद्यान्न आणून समतोल खाद्य तयार करून घ्यावे किंवा तयार खाद्य खरेदी करावे.

५) प्रतिवर्षी जास्तीत जास्त १२ गट वाढविता येतात. यासाठी पिले ब्रदर हाऊसमध्ये २० दिवस व ग्रोअर हाऊसमध्ये २१ ते ४२ दिवस वाढवावीत.

६) ४२ दिवसांत प्रतिपक्षी १.३ किलो खत तयार होते. त्यात नत्र, स्फुरद व पालाश भरपूर प्रमाणात असल्यामुळे बागायती शेतीमध्ये त्याचा पिकांना चांगला उपयोग होतो व शेती उत्पादनात वाढ होते.

पोल्ट्री फार्मसाठी कर्ज कसे घ्यावे? जाणून घ्या

बॉयलर पक्ष्यांचे संगोपनात खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

ब्रॉयलर

१) जोमदार व चांगल्या अनुवांशिक गुणधर्माची पिले

२) वयानुसार योग्य संतुलित वाढ व स्वच पाणी पिलांसाठी द्यावे.

३) पक्षांचे योग्य व्यवस्थापन व देखभाल

४) रोगनियंत्रण उपाय व दक्षता घेणे.

५) हिशेब पत्रके व व्यवसायातील नोंदी ठेवणे.

चांगल्या बॉयलर पक्षांचे गुणधर्म असे आहेत.

१) जलद शारीरिक वाढ

२) उत्तम रोगप्रतिकारक शक्ती

३) मांसल व पुष्ट स्नायू

४) पिसांची भरघोस वाढ व गुबगुबीत आकार

५) कळपातील पक्षांच्या वजनातील समानता

६) कमी खाद्याचे जास्त मांसात रूपांतर करण्याची क्षमता


आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा

शेतीसाठी वापरले जाणारे प्राकृतिक किटकनाशक बाजरी शेतीसाठी आवश्यक हवामान आणि माती Spraying Drones शेतीसाठी फायदे काय व कसे आहेत? शेतीसाठी स्काउटिंग ड्रोन्स (Scouting drone) चे फायदे व वापर कृषी अर्थसंकल्प म्हणजे काय? | Agriculture budget?