ससे पालन

ससे पालन हा व्यवसाय का करावा ? Sase palan हा व्यवसाय शेतकऱ्यासाठी जोडधंदा म्हणून कसा उपयोगी आहे या बद्दल mahiti in marathi.

वाढत्या लोक्संख्येमुळे अन्नधान्याची तसेच प्राणिजन्य प्रथिनांची कमतरता भासत आहे. हि परिस्थीती हिंदुस्थान सारख्या प्रगतशील देशात जास्त आहे. मागील ३० – ३५ वर्षाच्या सतत प्रयत्नानंतरही शरीराला आवश्यक असे प्राणिजन्य प्रथिने मिळणारे (मांस -मेंढी, शेळी, वराह व कोंबडी पालनाचे ) प्रकल्प राबवून ही कमतरता दूर करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मानवाच्या उत्तम स्वास्थाकरिता कमीतकमी १५ ग्रॅम प्राणिजन्य प्रथिने प्रत्येक व्यक्तीला दररोज मिळायला पाहिजेत. हा उद्देश पूर्ण करण्याकरिता भारतात ५ कोटी, ५० लाख टन मांस उत्पादन करायला हवे, कारण आपण फक्त १ कोटी, १० लाख टन मांस उत्पादन करतो. म्हणजे आपले सध्याचे उत्पादन पाचपटीने वाढविण्याची गरज आहे. ही पाचपट वाढ फक्त अशा प्राण्यांकडून शक्य आहे, ज्याच्या दोन पिढीतील अंतर कमी आहे व ते एका वेळेस अधिक पिलांना जन्म देतात. या दृष्टीने विचार केला तर ससा हा प्राणी योग्य ठरतो. कारण सशाच्या दोन पिढीतील अंतर ६ ते ८ महिने आहे. मादी एका वेळेस पिल्ले ६ -८ पिलांना जन्म देते व ५ – ६ वेळेस पिल्ले मिळतात. अडीच ते तीन महिन्यात त्यांचे वजन १ ते दिड किलो होते व तेव्हा ती पिल्ले बाजारात विकण्यायोग्य होतात. सशाच्या मांसात इतर कुठल्याही प्राण्यांच्या मांसापेक्षा प्रथिने, खजिने व जीवनसत्वे हे एका टक्याने तरी अधिक असतात , त्याशिवाय त्यांच्या केसाळ कातड्यापासून अधिक लाभ घेता येतो. मांस, फर, तलम लोकरीसाठी ससेपालन केले जाते.

ससेपालन फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी, हंगेरी, ब्रिटन, रशिया, चीन व अमेरिकासारख्या देशात मांस, फर,लोकर उत्पादनासाठी प्रगत संगोपन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मात्र त्यामागे हिंदुस्थानात अजून ससेपालनाकडे हवे तसे लक्ष सरकारने किंवा पशुपालकाने दिलेले नाही. १९७९ -८० पासून काही ठिकाणी छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरु झाला आहे. नागपुरात हे कार्य नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात १९८६ पासून सुरु आहे.

आता गरज आहे ती, भारतासारख्या उष्ण हवामानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याची पण त्याकरिता आर्थिक मदत अपेक्षित आहे. पुढील काही वर्षात ससा मांस उत्पादनाकरिता मोठ्या प्रमाणावर वापरले जाणार आहे. कारण त्यांचे मांस इतर कुठल्याही मांसापेक्षा जैविकदृष्ट्या उच्च प्रतीचे आहे. याशिवाय ते मानवाला लागणाऱ्या अन्नधान्यांच्या स्पर्धक म्हणून त्यांचे मांस मिळवू शकतो.


3 Comments
अविनाश डोईफोडे

May 16, 2021 @ 9:36 pm

Reply

Solpaur madhe ससे पालन साठी नर आणि मादी कोठे मिळेल.
मो- 9403475603

मनोहर पाचपोळ

September 6, 2022 @ 11:48 am

Reply

ससे विक्री आहे

Balaji Kamble 9922687184

December 2, 2022 @ 5:16 am

Reply

2 Nos Females’ 1 nos male

Leave Comment

आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा

शेतीसाठी वापरले जाणारे प्राकृतिक किटकनाशक बाजरी शेतीसाठी आवश्यक हवामान आणि माती Spraying Drones शेतीसाठी फायदे काय व कसे आहेत? शेतीसाठी स्काउटिंग ड्रोन्स (Scouting drone) चे फायदे व वापर कृषी अर्थसंकल्प म्हणजे काय? | Agriculture budget?