इमूचे व्यवसायिकरितीने व्यवस्थापन

इमू पालनात यशस्वी होण्यासाठी इमू- फार्म हा परिपूर्ण असणे गरजेचे आहे. रहदारीपासून फार्म हा लांब असावा. फार्म हा जाळीच्या कुंपणाने बंदिस्त असावा. या पक्षाला उडत येत नसल्याने त्यांना चालण्यासाठी व पळण्यासाठी मोकळी जागा लागते. त्यासाठी ५० फूट बाय २०० फूट कुंपण असावे. झालीच आकार २इंच बाय २इंच असावा. कुंपणाची उंची जवळ जवळ ७ फूट असावी. कुंपण फिट करताना वापरात येणारे नट- बोल्ट्स किंवा चैन लिंग  हे बाहेरच्या बाजूने येतील असे फिट करावे. त्यामुळे पक्षांना इजा होणार नाही. फार्मसाठी जमिनीची निवड खडकाळ व मुरमाळ अशी करावी. निवाऱ्यासाठी शेडची रचना केल्यास सूर्यप्रकाश चारी बाजूने येईल याची काळजी घ्यावी. एका शेडमध्ये एकाच वयाचे पक्षी असावे. पक्षांचा वयानुसार त्यांची शेड असावी. इतर पाळीव पाणी एकत्र ठेऊ नयेत.

इस्राइल मधला उद्योग तर दक्षिण आफ्रिकेतून शहामृगाची अंडी स्मगल करून आणून सुरु झाला आहे. शहामृग पालन करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यांच्याकडून अंडी व पिले यांची उपलब्धता समजू शकेल. गीरमोड हि कुक्कुटपालन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय इस्त्राईल कंपनी या क्षेत्रात आहे. हिंदुस्थानात हा उद्योग चालू हवाला आणि आणि आपण जगात घडणाऱ्या बदलांची ओळख करून घ्यावी. शहामृग पाळणे अवघड नाही. मात्र हि माहिती मिळविणे आवश्यक आहे. सर्वच पारंपरिक पशुपक्षांप्रमाणे शहामृगाच्या पिलांची काळजी घ्यावी लागते. नव्याने उद्योग सुरु करणाऱ्यांसाठी  मोठी  पिले आणता येतील.

शहामृग पासून खूप प्रकारची उच्च फायद्याची उत्पादने मिळतात. उदा. मांस, कातडे आणि पिसे यांसाठी शहामृगाचे पालन केले जाते.

पिसे – अत्यंत सूक्ष्म यंत्रे स्वच्छ करण्यासाठी, डेकोरेशन म्हणून फॅशन उद्योगामध्ये पिसांचा वापर करतात. अमेरिकेतील शहामृगाच्या पिसांपेक्षा निमवाळवंटी प्रदेशातील शहामृगाची पिसे अधिक मूल्यवान समजली जातात.      शहामृगाचे कातडे हे अत्यंत मौल्यवान मानले जातात. काही तज्ञ हे या कातड्यांची बरोबरी सापाच्या कातड्याशी किंवा मगरीच्या कातड्यांशी करतात. हल्ली इतरांना पिले पाळण्यासाठी देण्यासाठी शहामृगाचे पालन केले जाते.


आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा

कमी शेतीत जास्तीचे उत्पन्न कसे मिळवावे ? आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या . शेतीसाठी वापरले जाणारे प्राकृतिक किटकनाशक बाजरी शेतीसाठी आवश्यक हवामान आणि माती Spraying Drones शेतीसाठी फायदे काय व कसे आहेत?