नाशिकच्या लासलगाव एपीएमसीमध्ये सरासरी घाऊक कांद्याच्या दरात घट| Decrease in average wholesale onion price in Nashik’s Lasalgaon APMC

नाशिक : मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथील देशातील सर्वात मोठ्या घाऊक कांदा बाजारातील सरासरी घाऊक कांद्याच्या दरात गेल्या महिनाभरात ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सरासरी घाऊक कांद्याचे दर प्रति क्विंटल १८५० रुपयांवरून १२६० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत.

गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये काढणी केलेल्या उन्हाळी कांद्याचा साठा संपला आहे. लासलगाव येथे ताज्या खरीप कांद्याची आवक वाढली आहे.

लासलगाव एपीएमसी येथे दररोज १० हजार ते १२ हजार क्विंटल असलेल्या कांद्याची आवक आता १७ हजार ते १८ हजार क्विंटल झाली आहे.

या आठवड्यात कांदा बाजार भाव काय आहेत संपूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.

बुधवारी, ताज्या खरीप कांद्याची सरासरी घाऊक किंमत 1200 प्रति क्विंटल नोंदवली गेली, तर किमान आणि कमाल घाऊक किंमत अनुक्रमे 600 आणि 1500 रुपये प्रति क्विंटल नोंदवली गेली.


Leave Comment

author
By Jayashri Murkute
आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा