तुळजापूर पोलीस चौकी ने शेतकऱ्यांना सेंद्रिय पिकांची विक्री करण्यासाठी चौकीच्या परिसरात दिली जागा | Tuljapur Police station provided space to the farmers to sell organic crops in their premises

महाराष्ट्र (जिल्हा-तुळजापूर) : सेंद्रिय भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी धाराशिवचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी ह्यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात सेंद्रिय पिकांची विक्री करण्यास परवाणगी दिली.

पडताळणी केलेल्या शेतकऱ्यांना दर शनिवारी त्यांच्या शेतमालाची विक्री करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात जागा मोफत दिली जाईल. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी योग्य वेळी हा उपक्रम हाती घेतील.

सेंद्रिय शेती व्यवसाय कसा सुरु करावा?

“आम्ही रहिवासी, शेतकरी आणि पोलिसांसाठी Win-Win परिस्थिती निर्माण करत आहोत. आमचा जिल्हा दुष्काळी भागांपैकी एक आहे आणि आम्ही आमच्या सामाजिक योगदानाचा एक भाग म्हणून याची सुरुवात केली आहे,” कुलकर्णी यांनी सांगितले. एकट्या तुळजापूरमध्ये पोलिसांनी ५५ सेंद्रिय भाजीपाला पिकवणारे शेतकरी निवडले आहेत ह्या कार्याच्या शुभारंभासाठी.

या उपक्रमामुळे सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल कमी किमतीत विकता येणार आहे. “लोकांना सेंद्रिय भाजीपाला देखील मिळेल ज्यात रासायनिक आणि कीटकनाशके नसतील त्यामुळे त्यांना रोग आणि विकारांशी लढण्यास मदत होईल,” कुलकर्णी म्हणाले आणि पुढे म्हणाले यामुळे रहिवाशांना तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.

या उपक्रमाव्यतिरिक्त, पोलिस एक मोबाइल एप्लिकेशन (Mobile Application) विकसित करण्याचे काम करत आहेत, जे सेंद्रिय शेतकरी आणि ग्राहक यांच्यात पूल म्हणून काम करेल. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा उपक्रम म्हणजे त्यांच्या आणि रहिवाशांमधील संवादातील दरी कमी करण्याच्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे. “अधिकाधिक लोक आता सेंद्रिय भाजीपाला घेण्यासाठी पोलीस स्टेशनला भेट देतील, आम्ही त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या संधीचा उपयोग करू. यामुळे आम्हाला दुर्गम भागात आपले नेटवर्क बनवण्यास मदत होऊ शकते,” तुळजापूरचे निरीक्षक आदिनाथ काशीद म्हणाले.

सेंद्रिय उत्पादनामध्ये अँटिऑक्सिडंट्स (antioxidants) आणि फ्लेव्होनॉइड्स (flavonoids) जास्त असतात आणि ज्यात अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म असतात तसेच सेंद्रिय शेतीची प्रक्रिया बिगर सेंद्रिय शेतीपेक्षा पर्यावरणास अनुकूल म्हणून ओळखली जाते.


Leave Comment

author
By Santosh Savardekar
आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा