Soybean Bajar Bhav: सोयाबीन बाजाराकडून शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक वातावरण ? |Soyabean Market Rate

भारतातील सोयाबीन बाजार भावामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील बाजारात सोयाबीन दरात १०० ते २०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. मात्र पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीन दर सुधारण्याचा अंदाज आहे, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले आहे.

मागील आठवडाभर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Sobean Rate) मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत.

सोयाबीनचा मागील सात महिन्यांतील उच्चांकी दर चालू आठवड्यात गाठन्यात आला होता. तसेच सोयापेंडचेही (Soyacake) दर विक्रमी पातळीवर पोचले
होते.

मात्र देशातील सोयाबीन बाजारानं (Soybean Market) शेतकऱ्यांची निराशाच केली. देशातील बाजारात सोयाबीन दरात १०० रुपयांची नरमाई पाहायला मिळाली.

परंतू पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीन चा दर सुधारण्याचा अंदाज दिसत आहे, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात मोठे चढ उतार पाहायला मिळाले. या आठवड्यात सोमवारी सोयाबीनचे वायदे बंद होते.

मंगळवारी सोयाबीनचा दर ४ हजार ५१८ रुपये क्विंटल होतो. बुधवारीही दरातील वाढ कायम होती.

बुधवारी सोयाबीन दरानं मागील सात महिन्यांतील उच्चांकी दराचा टप्पा गाठत ४ हजार ६१४ रुपयांवर सोयाबीनचे भाव पोहचले होते. मात्र बुधवारीच बाजारात घसरण होऊन बाजार बंद झाले.

गुरुवारीही दर याच दरम्यान कायम होते. पण शुक्रवारी सोयाबीन दरात पुन्हा घट होऊन

रुपयात सांगायचं झालं तर हा दर ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच या आठवड्यात सोयाबीन दरात चढ उतार राहीले. मात्र शेवटी दरपातळी न वाढता कमीच झाली.

म्हणजेच सोयाबीनसोबतच सोयापेंडचे दरही या आठवड्यात कमी झाले. पण सोयाबीन आणि सोयापेंडची दरपातळी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काहीशी अधिक राहीली.

देशातील दरपातळी
देशातील शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून दरवाढीची प्रतिक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात मोठी वाढ झाली होती.

मात्र देशातील दरपातळी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. पण शुक्रवारी बाजारात क्विंटलमागं १०० रुपयांची नरमाई दिसून आली.

शनिवाराही बाजार समित्यांमधील हा दर कायम होता. शनिवारी देशातील बाजारात ५,२०० ते ५,५०० रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाला.

दरवाढीचा अंदाज

चीनकडून सोयाबीनला मागाणी वाढत आहे. तर अर्जेंटीनात दुष्काळी स्थिती आहे. अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले आहेत. मात्र देशातील बाजार स्थिर आहे.

पण चीनचं नववर्ष संपून बाजार सुरु झाल्यानंतर म्हणजेच जानेवारीच्या शेवटी देशातील बाजारातही सुधारणा दिसू शकते.

आजचे सोयाबीन बाजार भाव (Soyabean Market Rate)

त्यामुळं शेतकऱ्यांनी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात सोयाबीन विकू नये. सोयाबीनला सरासरी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.


Leave Comment

author
By Jayashri Murkute
आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा