पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 13वा हप्ता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. पण काही नियमात बदल करण्यात आल्याने काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसान चा हप्ता न मिळण्याचं कारण असं आहे की, जमीन आणि काही लाभार्थी शेतकऱ्यांचं रेकॉर्ड सेंट्रल डेटाबेसमध्ये अपडेट करण्यात आलेलं नाही. केंद्र सरकार कडून गैरप्रकार थांबण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत काही कागदपत्रे अपडेट करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं.
काही शेतकऱ्यांनी (Farmer) पीएम किसान योजनेसाठी लागणारी सगळी कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यामुळे त्यांना सध्याचा हप्ता मिळणार नाही. केंद्र सरकारकडून 31 मे रोजी 10.45 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून 22,552 कोटी रुपये जाहीर केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या पुढच्या हप्त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची घट झाली होती. 12 व्या हप्त्यात 8.42 कोटी शेतकऱ्यांना 17,443 कोटी रुपये जाहीर करण्यात आले.
केंद्र सरकारने (central government) गैरप्रकार थांबण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत काही कागदपत्रे अपडेट करण्यास अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आले असून देशातील काही राज्यांनी आता सेंट्रल डेटाबेस अपडेट करण्याचं काम सुरु केलं आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील काही गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांच्या वेबसाईटवरती शेतकऱ्याची ई-केवाईसी पुर्ण असावी.
- शेतकरी खरोखरच त्या जमीनीचा मालक आहे, त्याच्या जमिनीची सरकार दरबारी नोंद आहे.
- शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार कार्डला जोडलेले असावे.
- त्याचबरोबर बँक खाते भारतीय राष्ट्रीय निगम पेमेंटशी संबंधित असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्व सरकारी योजनांची माहिती मिळवा. (government schemes for farmers)