पपई उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, पपईने गाठले १० वर्षांतील विक्रमी दर पहा काय आहेत पपईचे बाजारभाव | Papaya farmers will benefit, papaya rate reaches record in 10 years

उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव येथील शेतकरी केळी उत्पादनासोबत पपईचं देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असतात. परंतू यंदा उत्पादनात विविध कारणांमुळं घट झाल्यानं पपईची दरवाढ झाली.

भारतात काश्मीर, बिहार, मुंबई, तसेच दिल्ली या प्रमाणे पपईला संपूर्ण देशात मागणी असते. उत्तर महाराष्ट्रामध्ये पपईचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यातील ७५ टक्के पपईचा माल हा दिल्ली येथे निर्यात केला जातो याठिकाणाहून ही पपई हे फळ देशात इतरत्र ठिकाणी एक्स्पोर्ट केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आजचे पपई बाजार भाव ( Papaya ) काय आहेत ?

भारतात पपईची मागणी वाढली असून पपई उत्पादक शेतकऱ्यांना जागेवरच २० ते २२ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. किरकोळ बाजारात तर पपईचा भाव ४० ते ५० रुपये किलो आहे. पपईचा हा भाव गेल्या आठ ते दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक भाव असून शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पादन होत आहे. पपईच्या या विक्रमी दरामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

जळगाव जिल्ह्यात केळीच्या शेतीला पर्याय म्हणून पपईकडे बघितले जाते. उत्तर महाराष्ट्रात यंदा थंडी चांगली होती, थंडीत साधारत: नागरिकांचा कल गरम असलेली फळे खाण्याकडे कल असतो. त्यामुळे पपईला मागणी वाढली, मात्र त्याप्रमाणात माल नसल्याने पपईला यंदा चांगला भाव मिळत आहे. गेल्या आठ ते दहा वर्षापूर्वीची स्थिती बघितली तर पपईला ६ ते ७ रुपये किलो असा भाव मिळाला होता, मात्र यंदा तिप्पट म्हणजे शेतकऱ्याला जागेवरच १८ ते २० रुपये भाव मिळत आहे. म्हणजचे एका क्विंटलला १८०० ते २००० रुपये किलो एवढा भाव शेतकऱ्याला मिळत आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच फेब्रवारी महिन्यातच अशा पध्दतीने पपईला विक्रमी असा भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे हे पपईचे मार्केटचे दर हे २५ ते २७ रुपये किलो असून किरकोळ बाजारात पपई ही ३० ते ४० रुपये दराने विक्री केली जात असल्याचे प्रगतीशिल शेतकरी सांगतात.

काही ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षांपासून पपईला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पपई लागवड कमी करून केळी, ऊस, मिरची यांसारख्या पिक उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे साहजिकच नेहमीच्या तुलनेत यंदा पपई फळाच्या उत्पादनात घट होऊन पपई लागवडीचे प्रमाण कमी झाले. तसेच नंदुरबार व धुळे येथे यावर्षी अतिपावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात पपईचे देखील नुकसान झाले. पावसामुळे फुलांचे रूपांतर हे फ्लॅट झाले नाही. त्याचप्रमाणे काही भागात पाऊस कमी झाला परंतु थंडीचे प्रमाण पपईच्या आवश्यकतेप्रमाणे असल्यामुळे पपईचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले.

लागवड कमी व मालाची मागणी वाढल्याने हेच पपईला विक्रमी भाव मिळण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे शेतकरी सांगतात. यंदा विक्रमी भावामुळे एका एकरात शेतकऱ्याला पपईचे लाखोचे उत्पन्न झाल असून शेतकरी मालामाल झाल्याचे पहायला मिळत आहे.


Leave Comment

author
By Jayashri Murkute
आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा