आता उन्हाळ्याला सुरुवात होत असून लिंबूचे भाव (Lemon Rate) अचानक वाढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात लिंबाचे दर शेकडा ३०० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळमध्ये तर विक्रेते मोठ्या आकाराचे लिंबू १० रुपयांना दोन व लहान आकाराचे १० रुपयांना तीन विकत आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये उन्हाच्या झळा सुरू होताच लिंबू चे बाजार भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यावर्षी सर्व विक्रम मोडीत काढत लिंबाची भाववाढ (Limbu bhav) सुरूच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे लिंबू विकले जात असून किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी ३०० ते ३५० रुपये मोजावे लागत आहेत. एरवी कमी भावात विकल्या जाणाऱ्या लिंबांना यावेळी सफरचंदाच्या तोडीचा भाव मिळत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना या भाव वाढीचा फायदा होऊ शकतो.
आजचे लिंबू बाजार भाव काय आहेत ?
महाराष्ट्र मध्ये नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहाता या भागात मोठ्या संख्येने लिंबाच्या बागा आहेत. तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे लिलाव मोठ्या प्रमाणावर होतात. यावर्षी उन्हाळ्यापूर्वीच लिंबाचे भाव वाढण्यास सुरवात झाली आहे . जानेवारी मध्ये १०० रुपये किलो दरम्यान असलेले भाव आता शंभरीच्या पुढे गेले आहेत. मागील काही काळापासून उन्हाचे चटके बसत आहे. तशी लिंबाला मागणी वाढून भावही वाढत गेले. त्या तुलनेत यंदा उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाववाढीला चालना मिळत गेली. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्चही वाढत असल्याचा परिणामही लिंबाच्या भावावर होत आहे.
श्रीगोंद्यातील लिंबू चांगल्या प्रतिचे असल्याने येथे खरेदीसाठी मोठ्या संख्येने व्यापारी येत असतात. त्यामुळे येथे खरेदीसाठी स्पर्धा लागते. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो, हे नक्की. मागणी वाढल्याने भावही वाढले आहेत. मात्र, लिंबाचे उत्पादन मर्यादितच आहे, अशी महिती लिंबू उत्पादक संघाच्या अध्यक्षांनी दिली. शेतकऱ्यांच्या म्हणणे आहे की, यावेळी भाव चांगला मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठी घट झाली आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे. हे उत्पादन घेण्यासाठी खर्च मात्र तेवढाच होत आहे. उलट महागाईमुळे तो वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होईल, केवळ गैरसमज आहे.