पक्षांना लस देतांना काही विशिष्ट मुद्यांकडे कटाक्षाने लक्ष देणे महत्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास लसीकरण परिणामकारक होत नाही व पक्षी रोगाला बळी पडण्याची शक्यता असते

लसीकरण करताना पक्षी निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी. 

लसीच्या वेष्टनांवर लिहिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. उल्लेख केलेल्या कालावधीच्या आतच लसीचा वापर करावा.

लसीकरणावेळी लस  बर्फाच्या भांड्यातच ठेवणे आवश्यक आहे. 

लस योग्य वयात, योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीनेच दिली गेली पाहिजे.

लसीकरणाची सर्व उपकरणे पाण्यात उकळून नंतर थंड करून मगच लस द्यावी

लसीच्या रिकाम्या बाटल्यांची दूरवर पुरून विल्हेवाट लावावी.

लसीकरणाच्या एक दिवस अगोदर व दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर जीवनसत्वे व इतर ताण दूर करणारी औषधे द्यावीत.

मोठ्या संख्येने पक्षी ठेवलेल्या फार्ममध्ये काही रोगांची लस पाण्याद्वारे देतात. अशावेळी पक्षांनी पिण्याच्या पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण करणारे कोणतेही औषध टाकू नये. 

पाण्यातून लस देण्यापूर्वी सुमारे एक तास पक्षांना साधे पाणी देऊ नये. त्यामुळे तहानलेले सर्व पक्षी लसमिश्रित पाणी लवकरात लवकर संपवतात.