मांसल कोंबडीपालन व्यवसायामध्ये पक्षांची विक्रीसाठी तयार झालेली एक बॅच बाजारात गेल्यानंतर व नवीन पिल्ले येण्याअगोदर घरांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणे खूपच महत्वाचे आहे.

रोग नियंत्रणासाठी पोल्ट्री मधील जुने तूस खरडून काढावे.

पक्षाच्या संगोपनासाठी उपयोगात येणारी सर्व उपकरणे धुण्याचा सोडा/ निर्जंतुक औषधाने धुवून उन्हात वाळवावी.

घराच्या भिंती, जाळ्या व छत २ टक्के धुण्याचा सोडा मिश्रित पाण्याने फवारून घ्याव्यात.

फ्लेम गणच्या साहाय्याने घरामधील सर्व फोती / कपारी जाळून घ्याव्यात.

घराच्या सभोवताली फॉरमॅलीन किंवा आयोडीन घटक याची फवारणी करावी.

पक्षाच्या पिण्याच्या पाण्याचे आयोडीन किंवा क्लोरीन पदार्थ वापरून शुद्धीकरण करावे.

पिल्ले झाल्यानंतर सुद्धा रोगप्रतिबंधक उपाय म्हणून फॉरमॅलीनची आठवड्यातून दोन वेळा फवारणी करावी.