शेळीला लागणारा चारा हा गायी आणि म्हशींच्या तुलनेत १/५ व १/६ चारा लागतो.

 शेळीपासून लहान वयात दूध मिळते.

शेळीचा उपयोग दूध, मांस, कातडी, केस व खताच्या उत्पादनासाठी होतो.

शेळीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असल्याने ते दूध पौष्टिक असते.

शेळीच्या मांसात चरबीचे प्रमाण कमी असल्याने मानवाच्या आहारांत त्याला विशेष महत्व आहे.

 शेळीच्या शिंगापासून व खुरांपासून उत्तम प्रकारचा डिंकयुक्त पदार्थ बनविला जातो.

 शेळी हा प्राणी आकाराने लहान असल्याने मोठ्या कळपाची वाढ हि झपाट्याने होते.

८ ते १० महिन्यापर्यंत वाढविलेली करडे मासांसाठी चालतात.