कोंबडी पालन ने व्यावसायिक स्वरूप धारण केल्यामुळे, कुक्कुटपालकांना ठराविक कालावधीत पक्षी विकसित करण्यासाठी पोल्ट्री फीडची आवश्यकता असते.

कोंबडी पालन ने व्यावसायिक स्वरूप धारण केल्यामुळे, कुक्कुटपालकांना ठराविक कालावधीत पक्षी विकसित करण्यासाठी पोल्ट्री फीडची आवश्यकता असते.

व्यावसायिक पोल्ट्री फीडमध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे इत्यादी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पक्ष्यांचा विकास ठराविक कालावधीत होतो.

पोल्ट्री फीड उत्पादनास सतत वाढणारी बाजारपेठ व मागणी जास्त आहे.

या व्यवसायासाठी कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध होतो आणि स्वस्तातही मिळू शकतो.

व्यवसाय अत्यंत लवचिक आहे; लहान, मध्यम किंवा मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करता येते.

जर स्वतःच्या मालकीचे पोल्ट्री फार्म असेल, तर स्वतःची फीड मिल असल्‍याने पुष्कळ पैसे वाचू शकतात आणि जेव्हा ते उत्पादन इतर फार्मला विकणार तेव्हा चांगला नफाही मिळू शकतो.

पोल्ट्री फीड व्यवसायासाठी उपकरणे आणि यंत्रसामग्री स्थानिक पातळीवर तयार केली जाऊ शकते.

पोल्ट्री फीड व्यवसाय सुरू करण्यासाठी पोल्ट्री फार्म असण्याची गरज नाही.