हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू होण्यासाठी व यावर आधारित उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी शासन अनेक योजनांचा लाभ देते.

कोंबडी पालन कर्ज म्हणजे कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनुदान देते.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होऊ शकतो.

सामान्य श्रेणीतील लोकांना सरकार  25% अनुदान देते . 

ST, SC श्रेणीतील पोल्ट्री धारकांना  35% सबसिडी देण्यात येते. 

हे अनुदान राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारे प्रदान केले जाते.

कुक्कुटपालन व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस हे कर्ज मिळू शकते.

अर्जदाराला कुक्कुटपालन किंवा कुक्कुटपालन व्यवसाय कुठे स्थापन करायचा आहे हे निश्चित असावे.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँके कडून कमाल 9 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.